पुणे

ओळखीचा फायदा घेत, तरुणाने केला तरुणीवर कार मध्ये बलात्कार! पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या

प्रतिनिधी: स्वप्नील कदम

पुणे :पहिलीच ओळख असलेल्या तरुणीला जेवण करण्याच्या बहाण्याने कार मध्ये घेउन जाऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खराडी ते लोणी काळभोर दरम्यान ही घटना घडली आहे.

याप्रकरणी विवेक सिद्धार्थ गाडेकर (३० रा. लोणी काळभोर) याला अटक केली आहे. या प्रकरणी २० वर्षीय तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.हा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी दोघे ओळखीतले आहेत. गुरवारी या तरुणीला आपण बाहेर जेवायला जाऊ. मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे, असे म्हणून कार मधून तिला घेऊन बाहेर गेला. खराडी परिसरातील एका ढाब्यावर त्यांनी जेवण केल. त्यानंतर घरी परत जात असताना रस्त्याच्या बाजूला गाडी थांबवून कारमध्ये बलात्कार केला.

दरम्यान या सर्व प्रकारानंतर तरुणीने तक्रार दिली. पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल करुन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस तपास करत आहेत.