पुणे

स्वराज घे भरारी ग्रुप च्या माध्यमातून हळदी कुंकु समारंभ उत्साहात साजरा

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी १५० वर्षांपूर्वी दिलेल्या योगदानाची विनम्र आदर्श ठेऊन हळदी कुंकू समारंभा पासून वंचित ठेवले जाते अशासाठी खास पुढाकार घेऊन स्वराज घे भरारी ग्रुप च्या माध्यमातून हळदी कुंकू समारंभ कार्यक्रम व सस्नेह मेळावा व अल्पोहार सँपन्न झाला.

या वेळी प्रमुख पाहुणे पुणे महानगरपालिका नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे व मार्गदर्शक सौ सुलभाताई साळुंके कार्यध्यक्ष सोलापूर सोशल फाउंडेशन यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार घालून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमा ची सुरवात केली.

या वेळी प्रमोद नाना भानगिरे यांनी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून व राज्यसरकार च्या माध्यमातून निराधार महिला साठी जे काही निधी उपलब्ध होईल व या महिला साठी वेगवेगळे रोजगार उपलब्ध होईल, मदत होईल याचा संपूर्ण पाठपुरावा मी करेल.. तसेच आपल्या कोणतीही समस्या असतील किंवा मदत असेल.. मी माझ्या माध्यमातून आपणांस करेल अशी ग्वाही दिली.

सैदव आपल्या पाठीशी आपल्या भावासारखा खंबीर उभा राहील अश्या भावना व्यक्त केल्या. तसेच सुलभा ताईनी आपल्या माध्यमातून भावगीते सादर करून आपले मनोगत व्यक्त केले.. यावेळी बोलताना मी सैदव आपल्या पाठीशी आहे कोणत्याही प्रकारची अडचण आपल्यास निर्माण झाली तर मी माझ्या फाऊंडेशन च्या माध्यमातून सोडवल्या जातील अशी ग्वाही दिली व कार्यक्रम चे कौतुक केले.

या वेळी विविध प्रकारचे खेळ स्पर्धा व बक्षिस वितरण हळदी कुंकू सोहळा पार पडला, कोविड प्रोटोकॉलचे पालन करत कार्यक्रमाचे नियोजन-डॉ स्वाती केंजळे, सौ ज्योती टिळेकर, नूतन बोडके, यांनी केले व प्रमुख उपस्थित कॅप्टन आशा शिंदे अलघा, मंदाबाई वसंत भानगिरे, वैशाली तरवडे, मनीषा भानगिरे, अनेक महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे आयोजन नाना भानगिरे आयोजक टीम ने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विरंगुळा केंद्रे येथे केले.