हवेली

चारचाकी च्या धडकेने एक  दुचाकीस्वाराचा मृत्यू अज्ञात चारचाकी वाहन चालकांविरोधांत गुन्हा दाखल

हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

ही घटना पुणे सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.

अपघातात भिमाजी फकिरा काळभोर (वय ५७) हे मृत्यूमुखी पडले आहेत. त्यांची पत्नी रेखा भिमाजी काळभोर (वय ५५) रा. बापदेव मंदिराचे शेजारी, पांडवदंड रोड, कदमवाकवस्ती ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात वाहनचालकाविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार काळभोर यांचा भाजीविक्रीचा व्यवसाय असुन त्यातुन मिळणाऱ्या उत्पन्नातुन ते उदरनिर्वाह करतात.

४ मार्च रोजी  रात्री ९-१५ वाजणेचे सुमारांस दोघे पती पत्नी कवडीपाट टोलनाका येथुन भाजीविक्री करुन पुणे सोलापुर महामार्गावरून ॲक्टीव्हा दुचाकी क्रमांक एमएच१२ पीवाय ८६५२ वरून घरी जाण्याकरीता निघाले होते. दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी ते पुणे सोलापुर महामार्गावरील  एचपी पेट्रोल पंप येथे आले. पेट्रोल भरून ते रात्री ९-३० वाजण्याच्या सुमारांस घरी जाण्यासाठी पुणे सोलापुर महामार्गाचे उजवे बाजुने जात असताना भरधाव वेगात पुणेकडुन सोलापुरकडे जाणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांचे ॲक्टीव्हाला धडक देवुन ते निघुन गेले.

झालेल्या अपघातामध्ये भिमाजी यांचे डोक्यास व छातीस मार लागल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. तसेच रेखा यांना मुक्का मार लागुन किरकोळ दुखापत झाली. दोघांना उपचारासाठी विश्वराज हॉस्पिटल लोणी स्टेशन येथे दाखल करण्यात आले. ५ मार्च रोजी पहाटे ३-५८ वाजण्याच्या सुमारांस भिमाजी काळभोर यांचे उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांचेवर अंत्यसंस्कार केलेनंतर अज्ञात चारचाकी वाहन चालकांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.