हवेली

वाघोली पुणे येथे नुकत्याच झालेल्या पुणे शहर अजिंक्यपद स्पर्धात गोल्डन सियारा पब्लिक स्कूलने देदीप्यमान यश मिळविले

हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत 22 पदकांची कमाई केली.
यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे स्कूल कमिटीचे अध्यक्ष शैलेश चंद, संचालक रमेश चंद, खजिनदार अर्जुन चंद, मुख्याध्यापिका प्रीती खणगे, सर्व शिक्षक, सेवकवृंद, विद्यार्थी-पालकांनी अभिनंदन केले.
कुमीते या प्रकारात- नंदिनी चव्हाण, हर्षिका खामकर,तन्वी भिसे,श्रावणी काळे,गौरी भिसे,मनीरुद्र शिंदे,चैतन्य कुंभार,रुद्रांश फराटे,वैभव रसाळ,अभिषेक जाधव,यानीं सुवर्णपदक, तर दिव्या चव्हाण,अनुष्का भोसले,नंदिनी भोईटे,कशिश घाडगे,अलोक पवार,यांनी रौप्यपदक व काता या प्रकारात अभिषेक जाधव कांस्यपदक मिळवले.
सर्वच विद्यार्थ्यांनी काता आणि कुमिते या प्रकारात उत्तम कामगिरी केली.सर्व खेळाडू कराटे मुख्य प्रशिक्षक हेमंत डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चॅम्पियन स्पोर्ट्स कराटे-डो असोसिएशन या संस्थेत कराटे प्रशिक्षण घेत आहेत.स्पर्धेत प्रावीण्य मिळविलेल्या खेळाडूंची निवड बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धासाठी झाली आहे.