महाराष्ट्र

कोरेगाव भिमा येथे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न

कवठे येमाई (प्रतिनिधी धनंजय साळवे) – कोरेगाव भिमा येथे गुरुवार दिनांक 02/06/2022रोजी वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी ऋषिकेश अशोकराव पवार,चेअरमन बबुशाशेठ ढेरंगे,सरपंच अमोलभाऊ गव्हाणे,विजय गव्हाणे,संपतराव गव्हाणे,केशवराव फडतरे,आनंदराव फडतरे,अशोक परदेशी,आणि मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते.
त्याबरोबर महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धा अतिशय चुरशीने खेळली गेली पुणे नगर जिल्हयातुन अनेक संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.प्रेक्षकांना अनेक चांगल्या खेळाडुंचा खेळ व चुरशीचे सामने पहायला भेटले.ह्या स्पर्धेचे उद्घाटन ऋषिकेश अशोकराव पवार,चेअरमन बबुशाशेठ ढेरंगे,सरपंच अमोलभाऊ गव्हाणे यांच्या हस्ते झाले.
ह्या स्पर्धेत प्रथम क्रमांक – पुणे,द्वितीय क्रमांक – कोरेगाव भिमा ,तृतिय क्रमांक – खडकी पिंपळगाव,चतुर्थ क्रमांक – उंब्रज या संघांनी मिळविला.
स्पर्धेचे बक्षिस वितरण शिरुर तालुका व्हॉलीबॉल चे मा.अध्यक्ष आनंदराव फडतरेमामा,राजु शिंदे,नितीन गव्हाणे व इतर ग्रामस्थांच्या उपस्थित पार पडला. विजेत्या संघांचे शिरुर तालुका व्हॉलीबॉलचे अध्यक्ष बाबाजी गावडे व उपाध्यक्ष सायकर तात्या,पारनेर तालुका व्हॉलीबॉलचे अध्यक्ष रावसाहेब वराळपाटील,सचिव सुधिर वाखारे ,युवाराष्टवादी सरचिटनीस पवनराजे जाधव यांनी अभिनंदन केले.