पुणे

पर्यावरण दिनानिमित्त वानवडी येथे स्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

पुणे (प्रतिनिधी)
संपूर्ण विश्वामध्ये विश्व पर्यावरण दिवस साजरा होत असताना वसुंधरा वन उद्यान फाउंडेशन पुणे आणि महाराष्ट्र वन विभाग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वानवडी हेवन पार्क सर्वे नंबर 45 याठिकाणी विशाल स्वच्छता आणि वृक्षारोपण अभियान संपन्न झाले.
सकाळी सात ते अकरा या वेळेत स्वच्छता अभियान व वृक्षारोपण करण्यात आले लोकांना पर्यावरण संकटाविषयी जागृत होण्याची प्रेरणा दिली. त्याचबरोबर नो प्लास्टिक युज, बीट एअर पोल्युशन, स्वच्छता व वृक्षारोपण विषयी बॅनर द्वारे देखील संदेश देण्यात आला. सध्या आपली पृथ्वी ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटाचा सामना करत आहे. अशावेळी आपल्याला स्वच्छता अभियान व वृक्षारोपण यासारखे अभियान राबविण्याची नितांत गरज आहे त्याच्या माध्यमातून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होईल. यावेळी महाराष्ट्र शासन वन विभागाचे अधिकारी मुकेश सनस (म.व.से.) ,
मंगेश सपकाळे, विशाल यादव, मनोज पारखे, मधुकर गोडगे व इतर वन विभागाचे कर्मचारी वृंद , तसेच “वसुंधरा वन उद्यान फाउंडेशन” चे पदाधिकारी व सदस्य, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मोहन आबनावे, एडवोकेट, अमित मोरे, निलेश गुरव, संगीता सातव, सोनाली नंबियार, सचिन तुंगतकर, कृष्णा सुर्वे हेवन पार्क वानवडी चे समाजसेवक जगजीत सिंग, पप्पू जाधव इत्यादींनी सहभाग घेतला.