पुणे

एकात्मिक बाल विकास प्रकल्प सेवा योजना उरुळी कांचन व पोस्ट ऑफिस पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आधार कार्ड कॅम्प सुरु प्रतिनिधी- स्वप्नील कदम

लोणी काळभोर -(कदमवाक वस्ती)एकात्मिक बालविकास प्रकल्प उरुळी कांचन व पोस्ट ऑफिस पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 9/7/2022 पासून 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांचे मोफत आधार कार्ड नोंदणी कॅम्प कदम वाक वस्ती पालखी स्थळ येथील अंगणवाडी मध्ये सुरू करण्यात आला
मोफत आधार कार्ड कॅम्प आयोजनासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी मा.नीलम भूमकर मॅडम,आणि पुणे येथील मा. श्री नवनाथ बनकर साहेब यांच्या विशेष सहकार्यातून आधार कार्ड कॅम्प चे नियोजन करण्यात आले आहे, 15 जुलै पर्यंत अंगणवाडी कार्यक्षेत्रातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्तेक बालकाचे आधार कार्ड चे काम 100% पूर्ण करण्यासाठी मा.पर्यवेक्षिका धनश्री नायर मॅडम आणि सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी नियोजन केले आहे,
कॅम्प ला आलेल्या सर्व लाभार्थ्यांना माजी ग्रामपंचायत सदस्य वसुधाताई केमकर यांनी अल्पोपहार ची व्यवस्था केली तसेच बाल आधार नोंदणीसाठी संपूर्ण सहकार्य ऑपरेटर हिमांशू जाधव, अमोल कोंढाळकर, अशलेशा कोरडे यांचे असणार आहे असे धनश्री नायर यांनी सांगितले.