महाराष्ट्र

कवठे येमाई ग्रामपंचायत मध्ये अभिलेख वर्गीकरण कक्षाचे उद्घाटन

कवठे येमाई ( प्रतिनिधी धनंजय साळवे) – कवठे येमाई येथील ग्रामपंचायतमध्ये 1935 पासुनचे स्वतंत्र अभिलेख वर्गीकरण करण्याचे काम नुकतेच पुर्ण करण्यात आले.याकामी सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी गेले दोन महिने अहोरात्र कष्ट घेतले.यात लेखपाल वसंत सावंत,ग्रंथपाल बबन शिंदे, कर्मचारी विकास उघडे,अमोल पंचरास,संगणक परीचालिका प्रतिमा काळे यांनी विशेष परीश्रम घेतले.अभिलेख वर्गीकरणमुळे नागरीकांना जलद जुने, नविन दाखले व सत्यप्रत देण्यास विलंब होणार नाही.या कक्षाचे नुकतेच गटविकास अधिकारी अजित देसाई, पं.सदस्य डॉ.सुभाष पोकळे,विस्तार अधिकारी बी.आर.गायकवाड,यांच्या हस्ते उद्घाटन झाले.या प्रसंगी सरपंच मंगलताई सांडभोर ,ग्रामसेवक चेतन वाव्हळ ,सर्व ग्रामपंचायत सदस्य व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.