पुणे

लहान मुलांच्या हातात दुचाकी वाहन चालविण्यास देऊन पालक फार मोठा धोका पत्करत तर नाहीत ना? इनोवेरा स्कूलच्या वतीने अल्पवयीन ड्रायव्हिंग विरुद्ध जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन

 

हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

 लहान मुलांच्या हातात दुचाकी वाहन चालविण्यास देऊन पालक फार मोठा धोका पत्करत तर नाहीत ना असा सवाल सध्या उपस्थित होत आहे कारण रस्त्यावर अलिकडे बरीच मुले सुसाट वेगात गाड्या चालवत असल्याचे चित्र दिसत आहे.यावर पुणे शहर पोलीस अंतर्गत असलेल्या लोणी-काळभोरचा गुन्हे प्रकटीकरण विभाग सरसावला असून या विभागाच्या वतीने सध्या या परिसरात शाळांमधून मुलांच्या मतपरिवर्तन करण्याचे काम हाती घेतले आहे

पुणे सोलापूर महामार्गावरील अपघातात अनेक शाळकरी मुले जखमी होतात तर बर्‍याच वेळा अपघाती मृत्यु झालेले आहेत.त्यामुळेच पुणे शहर पोलीसाच्या लोणी-काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस शिपाई ईश्वर भगत, पोलीस शिपाई घनश्याम आडके, पोलीस शिपाई प्रशांत सुतार, पोलीस शिपाई सत्यवान चव्हाण, पोलीस शिपाई बालाजी बांगर, पोलीस शिपाई विश्रांती फणसे यांनी सध्या एक विशेष मोहीम राबवत गावातील जयहिंद ज्युनियर काॅलेज,कन्या प्रशाला एंजल हायस्कूल इनोवेरा स्कुल येथे हे पथक सारखे भेटी देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. पालकांनी १८ वर्षाखालील आपल्या पाल्यांना दुचाकी वाहन चालविण्यास देऊ नये असे आवाहन करत आहेत याचा सकारात्मक परिणाम दिसताना दिसत आहे.

यासाठी इनोवेरा स्कूलच्या वतीने अल्पवयीन ड्रायव्हिंग विरुद्ध जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन हि करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. . यातून समाज जागृती करून वाहन चालवताना कोणती काळजी आणि नियम पाळावे हे सांगण्यात आले.

खर तर वाहतूक विषयक कोणत्याही अडचणीत शहर वाहतूक विभाग पुढे येणे अपेक्षित असताना देखील तस होताना दिसत नाही या विभागाच्या कार्यालया समोरुन अशी मुले विनादिक्कत वाहने तेही सुमार चालवताना दिसतात.परंतु गेल्या काही दिवसापासून गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या शिस्तप्रिय पोलीस शिपाई विश्रांती फणसे यांनी हे काम हाती घेतल्यानंतर सध्या मुलांमध्ये त्यांचा धसकाच घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.