पुणे

काँग्रेस कमिटी हडपसर ब्लॉक महिला अध्यक्ष पदी मंदाकिनी महेश नलावडे यांची निवड

हडपसर / पुणे (प्रतिनिधी )
पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या हडपसर ब्लॉक महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी मंदाकिनी महेश नलावडे निवड करण्यात आली आहे.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद भाऊ शिंदे, पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पूजा आनंद यांच्या हस्ते मंदाकिनी नलावडे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी शहर उपाध्यक्षा पल्लवी सुरसे, हडपसर ब्लॉक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शोएब इनामदार, प्राची दुधाने, वैशाली रेड्डी, प्रियंका ठाकूर, स्वाती शिंदे, राजश्री अडसूळ आणि इतर महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

काँग्रेस पक्षाला मोठे परंपरा असून त्यातून हा पक्ष उभा राहिला आहे, हडपसर विधानसभा मतदारसंघाची महिला ब्लॉकची जबाबदारी माझ्यावर टाकली असून या जबाबदारीच्या माध्यमातून आगामी काळात काँग्रेस तळागाळापर्यंत पोहोचावी व महिलांचा जास्तीत जास्त सहभाग व्हावा यासाठी कार्यरत राहणार आहे, तसेच पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी शहराध्यक्ष रमेश दादा बागवे, माजी आमदार मोहन जोशी व माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, पल्लवी प्रशांत सुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळामध्ये कार्यरत राहणार आहे, असे नवनिर्वाचित अध्यक्षा मंदाकिनी महेश नलावडे यांनी सांगितले.