पुणे

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प उरुळी कांचन, बिट- लोणी काळभोर येथे संपन्न,

प्रतिनीधी – स्वप्नील कदम

लोणीकाळभोर – (कदम वाक् वस्ती)ग्रामबाल विकास केंद्र पठारे वस्ती अंगणवाडी याठिकाणी दिनांक २३/१०/२०२२ पासून ग्रामबालविकास केंद्र ( VCDC )हा कार्यक्रम दोन महिने सतत चालू राहणार आहे. त्यामध्ये जी लहान मुले कुपोषित ,कमी वजनाची आहेत त्यांना सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत दर दोन तासांनी नाचणी ची खीर , गहुसत्व खीर,मेथी मुठीया ,कोथिंबीर मुठीया, केळी, मसाला इडली,मुरमुरा लाडू,उत्तपा,आणी थालपीठ असा आहार दिला जाणार आहे.त्याचबरोबर या कार्यक्रमाचे वैशिष्ठ म्हणजे बाळकृष्ण कोपरा त्यात खजूर,फुटाणे,राजगिरा लाडू, गुळ शेंगदांना लाडू असा आहार नियमित दिल्यास दोन महिन्यात ही मुले वजन वाढून नॉर्मल ला येतात असे पर्यवेक्षिका धनश्री नायर मॅडम यांनी सांगितले, या कार्यक्रमाला नंदू पाटील काळभोर ( माजी सरपंच कदम वाक वस्ती ) , रमेश गायकवाड RPI अध्यक्ष पूर्व हवेली,विजय थोरात ,नागसेन ओव्हाळ, शमी शेख, तात्या कारंडे, आणी पत्रकार रमेश निकाळजे हे उपस्थित होते, कार्यक्रमाची सुरुवात सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा परिषद यांच्यावतीने करण्यात आले पर्यवेक्षिका धनश्री नायर, सेविका पल्लवी निकाळजे, कविता कांबळे,दीपाली काळभोर,अलका काळभोर, रेखा दानवले,अश्विनी फलटणकर, मदतनीस मंगला माने,प्रमिला मोरे,ललिता थोरात,तसेच पालक व बालक उपस्थित होते.