पुणे

महापालिका आयुक्तांची मनमानी हडपसरकरांच्या पथ्यावर… रामटेकडी प्राण्यांचा प्रकल्प रद्द करा – नाना भानगिरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे (प्रतिनिधी )
हडपसर येथे पुणे महानगरपालिकेच्या वतीने होणाऱ्या प्राण्यांच्या हॉस्पिटल ला हडपसरच्या नागरिकांचा तीव्र विरोध असून महापालिकेने हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या या निवेदनात सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच हा प्रकल्प रद्द व्हावा अशी हडपसर करांची इच्छा आहे, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा भानगिरे यांनी दिला आहे.
पुणे महापालिकेत सध्या आयुक्त व प्रशासनाचे राज्य आहे शहरातील प्राणी व भटक्या कुत्र्यांच्या हॉस्पिटलसाठी मिशन पॉसिबल या संस्थेस 33 वर्षाच्या कराराने मनपाची रामटेकडी येथील जागा भाड्याने देण्याचा प्रस्ताव स्थायी समिती व मुख्य सभेत मान्य झाला आहे,
शिवसेनेने या प्रकल्पास तीव्र विरोध करूनही मनपा आयुक्तांनी प्रशासक अधिकारात मुख्य सभेत लोकप्रतिनिधी नसल्याचा गैरफायदा घेत स्वतःच्या अधिकारात हा प्रस्ताव मान्य करून घेतला आहे, हडपसर विधानसभा मतदारसंघात अनेक त्रासदायक प्रकल्प सद्यस्थितीत असून प्राण्यांच्या हॉस्पिटलमुळे हडपसर मतदार संघातील नागरिकांच्या समस्येत भर पडणार आहे.
प्रशासनाने धोरणात्मक निर्णय घेऊ नये असे लिखित संकेत असताना अधिकाराचा दुरुपयोग करून प्रशासन हडपसर विधानसभा मतदारसंघात हा प्रकल्प लादत आहे, पुणे शहर शिवसेनेचा या प्रकल्पास तीव्र विरोध आहे सेनेच्या व स्थानिकांच्या प्रकल्पाविरुद्ध भावना प्रक्षुबद्ध आहेत प्रशासनाने स्थायी समिती मुख्य सभेने ते मान्य केलेल्या प्रस्तावाचा फेरविचावर करावा अशी लेखी मागणी शिवसेना शहर प्रमुख माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन द्वारे केली आहे, हडपसर करांच्या दृष्टीने हा प्रकल्प त्रासदायक असल्याने तो रद्द व्हावा अशी जनमानसात भावना आहे आणि त्या सर्व पक्ष नागरिकांनी विरोधी केला आहे.

हडपसर मध्ये प्राण्यांच्या हॉस्पिटलचा त्रासदायक प्रकल्प नकोच….
पुणे महापालिकेने हडपसर परिसरात फक्त घाणेरडे कचऱ्याचे, प्राण्यांचे प्रकल्प करण्याचे ठरवले आहे हडपसर मध्ये माणसांसाठी बहुमजली हॉस्पिटल व्हावे हि कित्येक दिवसांची मागणी प्रलंबित असताना फक्त प्राण्यांचे प्रकल्प आणून हडपसर करांच्या जीवित अशी खेळ खेळला जात आहे या आयुक्तांच्या धोरणास आमचा प्रखर विरोध असून या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून निवेदन दिले आहे त्यांनी त्यांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिला आहे महापालिका प्रशासनाने हा प्रकल्प रद्द केला नाही तर वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार.

प्रमोद नाना भानगिरे
शिवसेना शहर प्रमुख