पुणे

नायगाव पेठ मध्ये सुभाष भगवंत चौधरी नामक व्यक्तीच्या खुनाने परिसरात खळबळ, आत्महत्या की घातपात लोणीकाळभोर पोलिसांचा शोध सुरु…!

पुणे: प्रतिनिधी;( रमेश निकाळजे )

हवेली पूर्व भागातील नायगाव पेठ येथे मार्ग वस्ती जवळ
सुभाष भगवंत चौधरी उर्फ बाबूतात्या ( वय वर्ष 54 ) नामक व्यक्तीचा पहाटे खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे, लोणी काळभोर पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून खुनाचे कारण व संशयित आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

नायगाव पेठ मधील मार्ग वस्ती कडून नायगाव कडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला मयत बाबूतात्या यांचा मृतदेह आज पहाटे काही नागरिकांना आढळून आला, ही माहिती लोणी काळभोर पोलिसांना समजताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले, बाबूतात्या यांच्याबद्दल अजून काही माहिती मिळते का याचा तपास सुरु आहे त्यांच्यामागे दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे असे समजते.