पुणे

समाजातील युवकांनी मुख्य प्रवाहात यावे – सचिन खंडाळे

पुणे: प्रतिनिधी:( रमेश निकाळजे )

शिक्षणापासून वंचित असलेला घटक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात तरुण वर्ग महत्वाची भूमिका बजावू शकतो, यासाठी मातंग समाजातील युवा वर्गाला शिक्षणाचे महत्त्व माहीत पाहिजे तेव्हाच तो पटलेलं महत्त्व वंचित वर्गाला सांगू शकेल.

याकरिता तरुण अनेक कार्यक्रम आयोजित करू शकतात, वंचित घटक हा परिस्थितीमूळे शिक्षण घेऊ शकत नाही ते जेथे राहतात तेथे जाऊन जर शिक्षण देता आले तर हा घटक शिक्षणप्रवाहात येऊ शकतो, यामध्ये धाडसी तरुण चांगले कार्य करतील असे मला वाटते,प्रबोधन पण आवश्यक आहे पण नुसत्या प्रबोधनाने जास्त फरक पडेल असे मला वाटत नाही, त्यांच्या मुख्य समस्या या दोन वेळच्या भाकरीच्या असतात या सुटल्यातरच त्यांचे लक्ष शिक्षणाकडे जाईल, उपाशीपोटी कोणी शिक्षण घेऊ शकत नाही,प्रथम रोजीरोटी प्रश्न सुटला पाहिजे, हा प्रश्न सुटला की आपोआप वंचित घटक शिक्षणप्रवाहात येईल.

तरुण वर्ग या गोष्टीचा विचार करून निरपेक्ष भावनेने वंचितांच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील राहिला तर नक्कीच चित्र आशादायक आहे, आशा कार्यासाठी तरुण तडफदार धाडसी तरुणांची खूप गरज आहे, वंचित घटक आणि शासन यामधील दुवा साधण्यासाठी मातंग तरुणांची खूप आवश्यकता आहे, आजचा तरुणच उद्याचा भारत घडवणार आहे, त्याची सुरुवात तरुणांनी वंचितांच्या शिक्षणापासून करावी तसेच मातंग समाजातील तरुणांना एक नवीन दिशा न दाखवता समाजातील तरुणांना व्यसनाधीन मार्गाकडे कसे जातील या कडे काही समाज कंटाकातील लोकांचा कल जास्त असतो त्याचा परिणाम समाज अधोगतीला जाण्यासाठी होतो त्या साठी मातंग समाजातील तरुणांनी वेळीच सावध व्हावे असे विचार यावेळी संगम वाडी येथे क्रांतिवीर वस्ताद लहुजी साळवे यांच्या जयंती निमित्त सांगितले.