मोहम्मदवाडीत डंपरची दोन तरुणांना धडक; एकाचा मृत्यू, एक गंभीर

Rokhthok Maharashtra 8 0

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे… मोहम्मदवाडी परिसरात डंपरने दोन तरुण दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
पुण्यातील मोहम्मदवाडी येथील शिव मंदिराजवळ, राहीजा व्हिस्टा सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सोमवारी, २१ सप्टेंबर रोजी हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन तरुण दुचाकीवरून जात असताना त्यांना डंपर ट्रकने धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला.
जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातानंतर परिसरात काही काळ खळबळ उडाली. अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.