ई-केवायसी बाकी आहे? रेशनचा लाभ बंद होऊ शकतो! अंतिम मुदत 30 सप्टेंबर

Rokhthok Maharashtra 11 0

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि शिधापत्रिकेवरील प्रत्येक लाभार्थ्याची अचूक ओळख निश्चित करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यातील रेशनधारकांनी 30 सप्टेंबर 2026 पूर्वी ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी शैलीला राजमाने यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यात ई-केवायसीसाठी एकूण 17 लाख 37 हजार 488 लाभार्थी पात्र आहेत. त्यापैकी आतापर्यंत 14 लाख 89 हजार 868 लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली असून, ही प्रक्रिया 85.75 टक्के इतकी पूर्ण झाली आहे.
मात्र अजूनही 2 लाख 47 हजार 620 लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया प्रलंबित आहे.
मुदतीत ई-केवायसी न केल्यास शासनाच्या नियमानुसार भविष्यात धान्याचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे. याची जबाबदारी संबंधित लाभार्थ्याची राहील, असे जिल्हा पुरवठा कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
ज्या लाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप झालेली नाही, त्यांनी आधार कार्ड घेऊन आपल्या रास्त भाव दुकानात संपर्क साधावा आणि तातडीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
30 सप्टेंबरची अंतिम मुदत लक्षात ठेवा… ई-केवायसी पूर्ण करा आणि रेशनचा लाभ सुरक्षित ठेवा!

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.