पंतप्रधानांनी देशावर 84 लाख कोटींचा डोंगर उभा केला; माजी अर्थमंत्री “जयंत पाटील” यांचा आरोप

Rokhthok Maharashtra 1 14

रोखठोक महाराष्ट्र न्युज

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात आली आहे असा आरोप माजी अर्थमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. देशावर ८४ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर मोदी सरकारने उभा केला आहे. देशातील सव्वाशे कोटी जनतेच्या डोक्यावर प्रत्येकी ६५ हजाराचे कर्ज करुन ठेवण्यात आले आहे असेही त्यांनी सांगितले.

देशावर वाढलेल्या कर्जाबाबत जयंत पाटील यांनी मिडियाशी बोलताना मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. जयंत पाटील म्हणाले की, नोटाबंदी, जीएसटी चुकीच्या अंमलबजावणीमुळे काही प्रश्न देशाच्या अर्थव्यवस्थेत निर्माण झाले आहेत. मोदी सरकारच्या साडेचार वर्षाच्या काळात ३० ते ४० लाख कोटीचें कर्ज वाढले तो पैसा गेला कुठे? देशावर कर्जाचा डोंगर उभा केलात तर त्यातून संरक्षणावर किती, देशातील रस्त्यावर किती खर्च केले याचा हिशोब मोदी सरकार देणार नाही. आज पानभरुन वृत्तपत्रात जाहिराती यायला लागल्या आहेत. एका वृत्तपत्रात दोन दोन – तीन तीन जाहिराती दिल्या गेल्या आहेत यावर लाखो कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत असेही ते म्हणाले.

या देशात भाजप कामापेक्षा जाहिरातीवर जास्त खर्च करत आहे. प्रवासावर खर्च वाढला आहे. परदेशी वार्‍यांवर खर्च जास्त झाला आहे. कामांपेक्षा जास्त गाजावाजा करण्यात आला आहे. त्यामुळे साडेचार वर्षांत वाढलेल्या कर्जाचा हिशोब मोदींना द्यावाच लागेल असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

0 0 votes
Article Rating
14 Comments
Oldest
Newest Most Voted

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.