चिकलठाणच्या जिल्हा परिषद प्रशालेची शिष्यवृत्ती परीक्षेत दमदार कामगिरी!

Rokhthok Maharashtra 20 0

इयत्ता ५ वीच्या सन २०२५-२६ शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्रशाला, चिकलठाणच्या सहा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये मोहन चव्हाण, श्रेयस खरे, यश जाधव, आरोही साबळे, आराध्या चव्हाण आणि आरोही चव्हाण यांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे चिकलठाणच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे. विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंदाकडून अभिनंदन करण्यात आले असून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.