संत निरंकारी मिशन द्वारा अमृत परियोजने अंतर्गत स्वच्छ जल- स्वच्छ मन अभियानाचा भव्य शुभारंभ…|

Rokhthok Maharashtra 1 0

प्रतिनिधी- स्वप्नील कदम

हवेली तालुक्यातील कवडी गाव मुळा मुठा नदी व त्या लगत आंतरराष्ट्रीय पक्षी निरक्षण केंद्र या ठिकाणी परिसर निरंकारी स्वयंसेवकांनी केला स्वच्छ संत निरंकारी मिशन मार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षा साविंदर हरदेव सिह जी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने रविवार, दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी ह्या अमृत परीयोजनेह अंतर्गत स्वच्छ जल- स्वच्छ मनह्य अभियान सकाळी ८ ते १२ या वेळेत संपन्न झाले.

या अभियांना मध्ये हवेली तालुक्यातील कवडी गाव मुळा मुठा नदी व त्या लगत आंतरराष्ट्रीय पक्षी निरक्षण केंद्र क्षेत्रातील पाण्यात पडलेले प्लास्टिक कचरा, सेंद्रिय कचरा, निरुपयोगी पदार्थ, अनावश्यक झुडपे, खराब अन्न पदार्थ जलपर्णी तसेच जलाशाया मध्ये आढळून येणारे शेवाळ जाळी युक्ति काठांचा वापर करून स्वच्छ करण्यात आले तसेच नदी काठ चा परिसर ही स्वच्छ करण्यात आला.
संत निरंकारी मिशन चे पुणे झोनल प्रमुख प्रभारी श्री. ताराचंद करमचंदनी यांनी या परियोगणे विषयी विस्तृत माहिती देताना सांगितले, की ही परियोगणा संपुर्ण भारतदेशात २७ राज्ये व केद्रशासित प्रदेशातील ७३० शहरांमध्ये जवळपास ११०० हुन अधिक ठिकाणी रबिवण्यात आली, अमृत परियोजने अंतर्गत पुणे जिल्यातील मुळा, मुठा, इंद्रायणी, निरा, भीमा, कऱ्हा, घोडनदी, पवणा, कुकडी, मीना, वेळू अशा सर्व नद्यांवरील विविध घाट त्याच बरोबर खडकवासला धरण, नाझरे धरण, कात्रज तलाव, पाषाण तलाव अशा ४१ ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये स्थानिक निरंकारी सेवादल तसेच निरंकारी भक्तगण ५००० हून अधिक संख्येने सहभागी झाले होते. जल संरक्षण आणि जल बचाव करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजण करुन ते कार्य नव्हीत करणे हा या परियोज नेचा मुख्य उद्देश होता.

बाबा हरदेवसिंहजी यांनी आपल्या कार्यकालात समाज कल्याणाचे अनेक उपक्रम राबवले. त्यामध्ये स्वच्छता व वृक्षारोपण अभियान यांची सुरवात प्रमुख आहेत. त्यांच्याच शिकवणूकीतून प्रेरणा घेत दरवर्षी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशनानुसार विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून यावर्षी अमृत परियोजनेचे आयोजन करण्यात येत आहे.

जनजागृती अभियाना अंतर्गत जनजागृती करण्यासाठी मुख्यत: ‘जल संरक्षण’ आणि उत्तम जलप्रथांच्या संदर्भात संदेश दर्शविणारी घोषवाक्ये, बॅनर्स, होर्डिंग्ज इत्यादिंचे प्रदर्शन तसेच पथनाट्यांद्वारे पाण्याचे महत्व आणि संरक्षणाच्या प्रति जागृती निर्माण करणे, पाण्यातून होणाऱ्या रोगांच्या बाबतीत जागृती, व सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘जल संरक्षण’विषयी जागरुकता इत्यादी कार्यक्रमांचा समावेश आहे.

ही परियोजना पर्यावरण संतुलन, प्राकृतिक सौंदर्य आणि स्वच्छतेसाठी केला जाणारा एक प्रशंसनीय व स्तुत्य प्रयास आहे. वर्तमान काळात आपण अशा प्रकारच्या लोक कल्याणकारी परियोजना राबवून आपल्या या सुंदर धरतीला नुकसानीपासून वाचवू शकतो तसेच प्राकृतिक संसाधनांच्या अनावश्यक वापरावरही अंकूश लावू शकतो.
या सर्व प्रशंसनीय कार्य चे स्तुत्य प्रयत्न असे उपस्थित ग्रामस्थ व पर्यटकांनी भावना व्येक्त केल्या अशा प्रकारे कवडी गाव येथील मुळामुठा नदी व त्या लगत चे आंतरराष्ट्रीय पक्षी निरक्षण केंद् स्वच्छ ता अभियान ब्रांच लोणी काळभोर चे मुखी राहुल जी काळभोर, सेवादल इन्चार्ज चंद्रकांत लोंढे जी व मोनिका कुंजीर जी यांच्या मार्गदर्शना खाली यशस्वीरित्या पर पडला.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.