पाचगणी येथील वाल्मीकी नगरमध्ये गादीच्या कारखान्यास आग ;उत्तर प्रदेशातील कामगारांचे आगीत 4 लाखांचे नुकसान….

Rokhthok Maharashtra 13 0

वाई प्रतिनिधी-ओंकार पोतदार

पाचगणी येथील वाल्मिकीनगरातील मंदिरा शेजारी उत्तर प्रदेशातील कामगिरांनी पत्र्याचे शेड भाड्याने घेवून त्यांनी गादी तयार करण्याचा कारखाना सुरू केला होता. काल दिनांक 14 फेब्रुवारी दुपारी अचानक आग लागली. त्या पत्र्याच्या शेड मध्ये गादि आणि गाद्या तयार करण्याचा माल होता. त्या अचानक लागलेल्या आगीमुळे संपूर्ण माल जळून खाक झाला. या आगी पूर्वी उत्तर प्रदेशातील कामगारांचे साधारण चार लाख रुपयांचे नुकसान झाले. व अचानक लागलेल्या आगीची खबर पाचगणी अग्निशमन विभागाला कळवण्यात आली. अग्निशामक विभागाबरोबर पालीकेचे कर्मचारी बंब घेऊन घटनास्थळी दाखल झाले. अग्नि नियंत्रण लवकर घटनास्थळी दाखल झाल्यामुळे आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.. पण चार लाखांची वित्तहानी झाली.. ह्या घडलेल्या घटनेचा अधिक तपास पाचगणी पोलीस स्टेशनचे A.P.I सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.