Hadapsar Housing Scam? 2018 पासून फ्लॅट बुक, अजूनही नाही ताबा; खरेदीदारांचा संताप

Rokhthok Maharashtra 2 0

पुण्यातील हडपसर परिसरात प्रसिद्ध बांधकाम कंपनी Shapoorji Pallonji Group च्या गृहनिर्माण प्रकल्पाविरोधात घरखरेदीदारांचा संताप उफाळून आला आहे.
२०१८ मध्ये फ्लॅट बुक केलेल्या अनेक नागरिकांना आज, २०२६ पर्यंतही घराचा ताबा मिळालेला नाही. रेरा नियमानुसार २०२१ पर्यंत ताबा देणे बंधनकारक असताना, प्रकल्प अजूनही अपूर्ण आहे.
खरेदीदारांचा आरोप आहे की, सुरुवातीला वेळेत घर देण्याची आश्वासने देण्यात आली, मात्र प्रत्यक्षात बांधकामाचा वेग अत्यंत मंद राहिला. इतकंच नाही, तर त्यांनी भरलेल्या पैशांच्या वापराबाबतही पारदर्शकता नसल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.

एका खरेदीदाराने भावनिक प्रतिक्रिया देताना सांगितलं – “आई-वडिलांना आपल्या नवीन घरात नेण्याचं स्वप्न होतं… पण ते स्वप्न पूर्ण होण्याआधीच ते गेले. आजही आम्ही भाड्याच्या घरात राहतोय आणि बँकेचे हप्ते भरतोय.”
या प्रकरणामुळे केवळ आर्थिकच नव्हे, तर मानसिक त्रासही सहन करावा लागत असल्याचं खरेदीदार सांगत आहेत.
दरम्यान, पुणे महानगरपालिका आणि Pimpri-Chinchwad Municipal Corporation यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. काही खरेदीदारांनी स्थानिक प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप केला आहे.
रिअल इस्टेट कायद्यानुसार प्रकल्प वेळेत पूर्ण करणं बंधनकारक असताना, अशा घटना वाढत असल्याने ग्राहकांचा विश्वास डळमळीत होत आहे.
आता जर लवकरात लवकर ताबा मिळाला नाही, तर आंदोलनाचा इशारा खरेदीदारांनी दिला आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.