जखमी महिला प्रवाशाच्या मदतीला धावल्या वृषाली सावंत; युवा क्रांतीकडून सन्मान

Rokhthok Maharashtra 24 0

डोंबिवली : रेल्वे स्थानक परिसरात जखमी अवस्थेत आढळलेल्या महिला प्रवाशाला तातडीने मदत करून रुग्णालयात पोहोचविण्यास सहकार्य करणाऱ्या मध्य रेल्वेच्या मुख्य तिकीट निरीक्षक वृषाली सावंत यांचा युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

स्वतःची प्रकृती ठीक नसतानाही सावंत यांनी माणुसकीचे दर्शन घडवत जखमी महिलेला मदतीचा हात दिला. त्यांच्या कर्तव्यनिष्ठा आणि संवेदनशीलतेचे कौतुक करत कार्यकारिणी अध्यक्षा मालती जोशी व युवा क्रांतीच्या सदस्यांनी त्यांचा सत्कार केला.

“अशा माणुसकी जपणाऱ्या व्यक्ती समाजासाठी प्रेरणादायी आहेत,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.