पुण्यात 200 हून अधिक मंडळांचा डीजे-मुक्त गणेशोत्सवाचा निर्णय!

Rokhthok Maharashtra 33 0

पुण्यात दहीहंडी आणि गणेशोत्सवातील डीजेच्या मोठ्या आवाजावरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर यंदा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील तब्बल 200 हून अधिक गणेश मंडळांनी डीजे-मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी याबाबत माहिती दिली. पुण्याच्या गणेशोत्सवाची पारंपरिक आणि सांस्कृतिक ओळख जपणे, तसेच ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
यंदाचा गणेशोत्सव आता डीजेच्या दणदणाटापेक्षा परंपरा, संस्कृती आणि सामाजिक संदेशांवर अधिक भर देणारा ठरणार आहे.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.