भिवंडीत चार ATM केंद्रांना चोरट्यांचा लक्ष्य; आठ AC लंपास!

Rokhthok Maharashtra 6 0

भिवंडीत चोरट्यांनी आता थेट एटीएम केंद्रांनाच लक्ष्य केलं आहे! मात्र, एटीएममधील पैसे नाही, तर चोरट्यांनी चक्क एसी आणि त्यांचे आउटडोअर युनिट चोरून नेले आहेत.
भिवंडीतील कशेळी, कामतघर आणि राहनाळ परिसरातील चार एटीएम केंद्रांमधून तब्बल आठ एसी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या चोरीमुळे सुमारे दोन लाख ४० हजार रुपयांचं नुकसान झालं आहे.
कशेळी येथील एसबीआय एटीएममधून दोन एसी, तर कामतघर येथील एचडीएफसी आणि ॲक्सिस बँक तसेच राहनाळ येथील ॲक्सिस बँक एटीएममधून सहा एसी चोरट्यांनी लंपास केले.
या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.