नागपुरात API ज्ञानेश्वर झोल यांची आत्महत्या! स्वातंत्र्यदिनी पोलीस अधिकाऱ्याच्या मृत्यूने खळबळ; कारण काय?

Rokhthok Maharashtra 49 0

नागपूरमधून स्वातंत्र्यदिनी पोलीस दलाला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.
नागपूर शहर पोलीस आयुक्तालयातील अर्ज तसेच शिष्टाचार विभागात कार्यरत असलेले ३५ वर्षीय सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर झोल यांनी आपल्या राहत्या घरी जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे.
कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याने अचानक टोकाचे पाऊल उचलल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मात्र, झोल यांनी हे पाऊल नेमके कोणत्या कारणामुळे उचलले, याचे स्पष्ट कारण अद्याप समोर आलेले नाही.
वैयक्तिक, कौटुंबिक किंवा कामाच्या तणावातून हा निर्णय घेतला का, याबाबत सध्या केवळ चर्चा सुरू आहे. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
घटनेपूर्वी झोल कोणाच्या संपर्कात होते, त्यांची मानसिक किंवा वैयक्तिक परिस्थिती काय होती, याचा तपास केला जात आहे. घटनास्थळी सुसाईड नोट किंवा अन्य महत्त्वाचा पुरावा मिळाला आहे का, याबाबतही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
त्यामुळे API ज्ञानेश्वर झोल यांच्या मृत्यूचे नेमके कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.