पुणे जिल्ह्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी; आमदार राहुल कुल यांच्या साखर कारखान्यावर कारवाईचे आदेश. प्रतिनिधी -स्वप्नील कदम

Rokhthok Maharashtra 13 0

पुणे भीमा पाटस साखर कारखान्याला साखर आयुक्तांनी मोठा दणका दिला
आहे. कारखान्यातील साहित्य जप्तीचे आदेश देण्यात आले आहे. कारखान्याकडून शेतकऱ्यांचे ऊसाचे ५ कोटी ७८ लाख रुपये थकवले असल्याच्या तक्रारी साखर आयुक्तांकडे प्राप्त झाल्या होत्या. चातकारीनंतर आता साखर आयुक्तांनी भीमा पाटस साखर कारखान्यातील साहित्य जप्तीचे आदेश दिले आहेत. दाचे आमदार व भीमा पाटस साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांना बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून भीमा पाटस साखर कारखान्याचा विषय चर्चेला आला होता.

या साखर कारखान्यात ज्या शेतकयांनी गाळपासाठी ऊस आणला होता, त्यांनी आमचे ५ कोटी ७८ लाख रुपयेच्या तक्रारी केल्या होत्या. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. दरम्यान, यामधील शेतकऱ्यांनी साखर आयुक्ताकडे तक्रार दाखल केली होती. आमचे पैसे तातडीने मिळवून द्या, अशी मागणी या कडून करण्यात आली होती. दरम्यान, साखर आयुक्तांनी यासंदर्भात भीमा पाटस साखर कारखान्याला नोटीस पाठवली होती. शेतकन्यांच्या या तक्रारीबाबत तातडीने खुलासा करावा आणि शेतकयांचे पैसे कधी देणार? याबाबत तातडीने उत्तर द्या, अशी विचारणा नोटीशीमध्ये करण्यात आली होती. मात्र, याबाबत साखर कारखान्याकडून कुठलीही योग्य कारवाई करण्यात आली नाही.

तसेच शेतकऱ्याचे पैसे देखील परत केले नसल्याची माहिती आहे. यानंतर आता साखर आयुक्तांनी यासंदर्भात कडक कारवाई करत भीमा पाटस साखर कारखान्यातील असलेल्या साहित्याच्या जप्तीचे आदेश दिलेले आहेत. या जप्तीच्या साहित्यातून शेतकयांचे पैसे परत केले जाणार आहे. एकंदरीत भाजप आमदार राहुल कुल यांना बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.