“महिला कोव्हीड योद्धा” मराठा टायगर फोर्स च्या वतीने सन्मान जिजाऊंच्या लेकींचा

Rokhthok Maharashtra 1 1

पुणे / हडपसर (प्रतिनिधी)
एकच वारी बारा जानेवारी, राष्ट्रमाता राजमाता माँ साहेब जिजाऊ यांच्या जयंती निमित्त हडपसर मध्ये स्वतः च्या जीवाची पर्वा न करता कोविड-19 सारख्या भयंकर अशा जागतिक महामारी मध्ये आपली जबाबदारी समजून जनतेला सेवा दिली अशा जिजाऊंच्या लेकींचा सन्मान करण्यात येणार आहे
यामध्ये महिला पोलीस कर्मचारी, पीएमपीएमएल महिला कर्मचारी, महिला डॉक्टर, महिला आरोग्य सेविका, महिला सफाई कर्मचारी आदींचा सन्मान करण्यात येणार आहे
या कार्यक्रमासाठी नगरसेविका हेमलता मगर, स्वीकृत नगरसेविका संजीवनी जाधव, पल्लवी सुरसे, स्वाती टेळे पाटील, सुवर्णा जगताप, संभाजी ब्रिगेड चे नेते संतोष शिंदे आदी सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन मराठा टायगर फोर्स (MTF)चे संस्थापक अध्यक्ष संदीप लहाने पाटील, उपाध्यक्ष निलेश आण्णा काळे, रोहिणी भोसले, सविता मोरे, सुनंदाताई देशमुख, जानवी गाडेकर, अश्विनी वाघ, शितल लहाने यांनी केले आहे

0 0 votes
Article Rating
1 Comment
Oldest
Newest Most Voted

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.