फिटनेस साठी रनोहोलिक्स ग्रुपतर्फे दोन दिवसीय म्ँरेथान चे आयोजन

Rokhthok Maharashtra 1 0

हडपसर (प्रतिनिधी)
फिटनेस साठी रनोहोलिक्स ग्रुपतर्फे शनिवारी आणि रविवारी म्ँरेथान चे आयोजन करण्यात आले.
शनिवारी हाफ मँरेथान २१ किमी  आणि रविवारी फुल मँरेथानन ४२ किमी आयोजित करण्यात आली. २१ किमी साठी ३५ धावपटु आणि ४२ किमी साठी ३२ धावपटु सह़भागी झाले.
या स्पर्धेमध्ये रनोहोलिक्स ग्रुप सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. डॉ योगेश सातव ह्यांच्या संकल्पनेतुन पार पडलेल्या ह्या  स्पर्धेचे रेस डायरेक्टर श्री नितिन गुप्ता आणि डॉ प्रविण जावळे होते.
उद्योजक दशरथ जाधव, आबा उंद्रे, देविदास होले, डॉ. शंतनु जगदाळे, डॉ. सुहास लांडे पाटील,  विनोद बोरोले, रश्मी सातव, शैलेश चिकटे आणि शैलेश गायकवाड यांनी स्पर्धेच्या आयोजनात मोलाचे सहकार्य केले. तसेच सर्व रनोहोलिक्स सदस्यांनी व स्वयंसेवकांनी खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.