पुण्यामध्ये ‘डीआरआय’ च्या अधिकाऱ्यांनकडून मोठी कारवाई : 2 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त…!

Rokhthok Maharashtra 1 0

पुणे : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) पुण्यात मोठी कारवाई केली आहे. बनावट नोटा चलनात आणणाऱ्या तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे कस्टमच्या अधिकाऱ्यांसह डीआरआय पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली.

बांगलादेशातून बनावट नोटा आणून तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) अटक केली आहे. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. खडकी बाजार परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.

बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करत असलेल्या तीन आरोपींची माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाकडून (डीआरआय) पथकाला मिळाली होती. त्यानुसार पुणे प्रादेशिक युनिटच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून खडकी परिसरात एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून भारतीय चलनातील ५०० रुपये मूल्याच्या ४०० नोटा जप्त करण्यात आल्या.

तस्करीच्या बनावट भारतीय चलनी नोटा बाळगल्याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारावर आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.