*‘दरमहा १० हजार हप्ता दे!’ बिल मागितल्यावर गुंडाची हॉटेलमध्ये दहशत*

Rokhthok Maharashtra 7 0

‘बिल मागितलंस तर तूच मला दरमहा १० हजार दे!’ पुण्यात हॉटेलमध्ये गुंडगिरी; एकाला अटक
पुण्याच्या कॅम्प परिसरातील एमजी रोडवरील कोहिनूर हॉटेलमध्ये जेवणाचे बिल मागितल्याच्या रागातून गुंडांनी हॉटेलमध्ये तोडफोड करत वेटरला धमकावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर बिल एक हजार रुपये झाले होते. मात्र, त्यापैकी केवळ २०० रुपये देत उर्वरित बिल देण्यास नकार दिला. वेटरने उरलेल्या रकमेची मागणी केली असता आरोपींनी त्याला शिवीगाळ आणि मारहाण केली.
इतकंच नाही, तर हत्याराचा धाक दाखवत ‘आता तूच मला दर महिन्याला १० हजार रुपये हप्ता दे, नाहीतर तुला जीवे मारू’, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.
आरोपींच्या साथीदारांनी कमरेचा पट्टा टेबलावर आपटून दहशत निर्माण केली, तर हॉटेलमधील काचेचे ग्लास फोडून तोडफोड केली. गर्दी जमू लागल्यानंतर आरोपी दुचाकींवरून फरार झाले.
या प्रकरणी लष्कर पोलिसांनी परमजीत प्रेमचंद मेहरा, वय ३५, याला अटक केली आहे. शहबाज शेख आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास लष्कर पोलीस करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.