उद्धव सेनेत ठिणगी! 🔥प्रियंका चतुर्वेदींचा पक्षाविरोधात सूर महिला आरक्षणावरून वाद

Rokhthok Maharashtra 2 0

महिला आरक्षण विधेयकावरून राजकारण तापलं असताना, उद्धव सेनेत अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत.
माजी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी थेट पक्षाच्या भूमिकेविरोधात जाऊन महिला आरक्षणाला समर्थन दिलं आहे.

लोकसभेत नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर होऊ शकलं नाही.
दोन-तृतीयांश बहुमताची गरज असताना, बाजूने 298 तर विरोधात 230 मतं पडली.

यानंतर प्रियंका चतुर्वेदी यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत,
“हा भारतीय लोकशाहीसाठी दुःखद दिवस आहे,” असं म्हटलं.

तसंच, महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका कायम राहील,
आणि ती सोयीनुसार बदलणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

या वक्तव्यामुळे उद्धव सेनेत नाराजी आणि बंडाची चर्चा पुन्हा रंगली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.