कल्याणमध्ये चोरांची फॅमिली गँग ACTIVE; पोलिसांनी केला पर्दाफाश

Rokhthok Maharashtra 19 0

कल्याणमध्ये पोलिसांनी एका धक्कादायक फॅमिली गँगचा पर्दाफाश केला आहे…या टोळीमध्ये वडीलच आपल्या मुलांकडून घरफोड्या करून घेत होते.
विलास भालेराव आणि दीपक जाधव हे दोघे वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये फिरून बंद घरांची रेकी करायचे…

आणि त्याची माहिती आपल्या मुलांना द्यायचे.यानंतर ही मुलं बंद घरांचे कुलूप तोडून घरफोडी करायची.
रोख रक्कम मौजमजेसाठी वापरली जायची… तर सोन्याचे दागिने वडील विकायचे.

महात्मा फुले चौक पोलिसांनी या प्रकरणात कैलास भालेरावसह तिघांना अटक केली आहे…
तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे.पोलिसांनी आरोपींकडून तब्बल 21 लाख 60 हजार रुपयांचे 18 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

या कारवाईत कल्याण परिसरातील 4 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून पुढील तपास सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.