गर्ल्स हॉस्टेलबाहेर बॉम्बची भीती… बॉक्स उघडताच निघाला Teddy Bear!

Rokhthok Maharashtra 15 0

सकाळी 8 वाजून 15 मिनिटांची वेळ…
स्थळ — पिंपरी चिंचवडमधील डीवाय पाटील गर्ल्स हॉस्टेल…

हॉस्टेलच्या गेटबाहेर अचानक एक मोठा बॉक्स दिसताच खळबळ उडाली.
बॉम्बची भीती निर्माण झाल्याने पोलिसांना तातडीने पाचारण करण्यात आलं.

पोलिसांनी परिसराचा ताबा घेत नाकेबंदी केली…
विद्यार्थिनींना बॉक्सपासून दूर ठेवण्यात आलं…

अखेर पोलिसांनी बॉक्स उघडला… आणि त्यात निघाला एक टेडी बेअर!

त्यानंतर टेडी बेअरचीही तपासणी करण्यात आली.
सुदैवाने त्यात कोणतीही धोकादायक वस्तू आढळली नाही.

तपासात समोर आलं की, एका विद्यार्थिनीच्या बॉयफ्रेंडने हा टेडी बेअर गिफ्ट म्हणून पाठवला होता.

मात्र हा बॉक्स ठेवणारा नेमका कोण? याचा तपास अजूनही सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.