गांजा विक्री करणाऱ्या एकाच कुटुंबातील दोन सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांकरिता हद्दपार

Rokhthok Maharashtra 2 0

लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील बेकायदेशिररित्या गांजा विक्री करणारा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आकाश संतोष भाले, (वय २३ वर्षे रा. लोणीकाळभोर, ता. हवेली जि. पुणे) व महीला मंगल संतोष भाले वय-४० वर्ष रा.लोणी काळभोर हे आरोपी पोलिसांच्या प्रतिबंधक कारवाईस न जुमानता सातत्याने गांजा विक्री करत
तसेच गुन्हेगारी कारवाया करून सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधक असलेली कृत्ये करीत होते. त्याच्या या कृत्यामुळे सामान्य नागरिक व महाविद्यालयीन विद्यार्थी व्यसनाधीन होऊन त्यांचे आर्थिक नुकसान तसेच संसार उद्ध्वस्त होत असल्यामुळे लोकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली होती. त्यामुळे राजेंद्र पन्हाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी ड्रग्स, गांजा अंमली पदार्थ मुक्त पुणे शहर विशेष मोहिमेच्या अनुषंगाने या दोन सराईत आरोपीविरूध्द हद्दपारीचा प्रस्ताव तयार करुन मा. पोलीस उपआयुक्त परि. ०६, पुणे शहर, यांच्याकडे पाठविला असता मा. पोलीस उप आयुक्त राजकुमार शिंदे यांनी आरोपी आकाश संतोष भाले, व मंगल संतोष भाले यांना २ वर्षे कालावधी करीता हद्दपार करणे बाबतचे आदेश मंजुर केले आहेत. तसेच यापुढेही अशाप्रकारे बेकायदेशीर धंदे करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे
असा इशारा लोणी काळभोर पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिला.

 

 

सदरची कारवाई डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परि. ०६, पुणे शहर, अनुराधा उदमले, सहा. पोलीस आयुक्त, लोणी काळभोर विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), स्मिता पाटील, पोउपनिरी प्रल्हाद जगताप, पोलीस हवालदार सुनिल नागलोत, पो.हवा. तेज भोसले, पोलीस अंमलदार प्रशांत नरसाळे, दिपक सोनवणे, महिला पोलीस अंमलदार योगिता भोसुरे यांनी केली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.