ग्राहक बनून महिलांनी सोन्याचं दुकान लुटलं; पुण्यात धक्कादायक चोरी!

Rokhthok Maharashtra 2 0

पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट सुरूच असून, आता ग्राहक बनून आलेल्या महिलांनी थेट सोन्याचं दुकान लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
भोर तालुक्यातील नसरापूर बाजारपेठेतील पंडित ज्वेलर्समध्ये पाच महिला आणि एक लहान मुलगा ग्राहक असल्याचा बहाणा करून दुकानात दाखल झाले.

दागिने पाहण्याच्या नावाखाली त्यांनी कर्मचाऱ्यांचं लक्ष विचलित केलं आणि नथनीचे दोन पाऊच अत्यंत शिताफीने लंपास केले.
हा संपूर्ण प्रकार इतका नियोजनबद्ध होता की दुकानातील कुणालाही संशय आला नाही.

काही दिवसांनी स्टॉक तपासताना दोन पाऊच गायब असल्याचं लक्षात आल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं आणि चोरीचा संपूर्ण प्रकार उघड झाला.
या चोरीमध्ये सुमारे 6 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेले असून, त्यांची किंमत तब्बल 84 हजार 600 रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.

या घटनेनंतर नसरापूर बाजारपेठेत भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, व्यापाऱ्यांनी पोलिस गस्त वाढवण्याची आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.