चिमुकल्यावर अमानुष वागणूक, आरोपी फरार

Rokhthok Maharashtra 17 0

उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका लग्नसमारंभात 11 वर्षांच्या मुलासोबत गंभीर अत्याचार झाल्याचा आरोप आहे.

माहितीनुसार, मुलाने वारंवार गोड पदार्थ मागितल्याने आचारी संतापला आणि 11 वर्षीय मुलाला पेटत्या तंदूरमध्ये फेकले.

तंदुरमधील आगीच्या ज्वाळांमुळे मुलगा चेहऱ्यापासून कंबरेपर्यंत भाजला गेला आहे. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता, मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

या प्रकरणामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून कठोर कारवाईची मागणी होत आहे 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.