जागतिक किर्तीचे चित्रकार शशिकांत धोत्रे यांच्या “अफलातून” कलाकृतींचे मुंबईत प्रदर्शन!

Rokhthok Maharashtra 19 0

पहिल्याच दिवशी कलाप्रेमी उद्योगपती दिग्गजांनी तीस टक्के कलाकृती केल्या खरेदी – राजा माने
मुंबई, दि . १८: आपल्या पेन्सिल चित्रांनी जागतिक चित्रकला क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केलेले शशिकांत धोत्रे यांच्या विविध वस्तू, पेन्सिल, पाण्याचे रंग या माध्यमातून साकारलेल्या “अफलातून” कलाकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आज वरळी येथील आर्ट ॲन्ड सोल गॅलरीत झाले. हे प्रदर्शन ८ मार्च पर्यंत राहणार आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी देशातील काही ख्यातनाम कलाप्रेमी उद्योगपतींनी प्रदर्शनातील कलाकृतींपैकी तीस टक्के विविध कलाकृती खरेदी केल्या, हे विशेष!

 

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या त्यात अनेक उद्योग समुहांच्या प्रमुखांचा समावेश होता. “पोस्टर बॉईज” फेम सिने निर्माता, दिग्दर्शक, लेखक व अभिनेता समीर पाटील, संपादक, माध्यम तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक अ. भा. डिजिटल मिडिया संघटनेचे अध्यक्ष राजा माने, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील मातृभूमी प्रतिष्ठान समाजसेवी समूहाचे संस्थापक अध्यक्ष संतोष ठोंबरे, मातृभूमीचे सहसचिव व शिवशाकी बँकेचे संचालक मुरलीधर चव्हाण, उद्योजक कुंदन हुलावले, ज्येष्ठ पत्रकार तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य व प्रवरा मेडिकल ट्रस्टचे सल्लागार सचिन गोरडे पाटील,उद्योजक – पत्रकार ब्रम्हा चट्टे, अभिनेत्री शितल चव्हाण यांनीही प्रदर्शनाला भेट दिली. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरपूर येथून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपला कलासेवा प्रवास सुरु करुन आज देश विदेशातील विख्यात आर्ट गॅलरी मध्ये मानाचे स्थान प्रस्थापित करणाऱ्या व “सजना” या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत निर्माता – दिग्दर्शक म्हणून पाऊल टाकलेल्या शशिकांत धोत्रे यांनी प्रदर्शनातील प्रत्येक कलाकृतीची विलोभनीय जन्मकथा यावेळी सांगितली.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.