ज्येष्ठ संपादक संजय भोकरे यांच्या हत्येचा कट उधळला | पिस्टलसह टोळी जेरबंद |

Rokhthok Maharashtra 2 0

सांगलीत ज्येष्ठ संपादक आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे राज्य संघटक संजय भोकरे यांच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत खुनाच्या तयारीत असणाऱ्या टोळीला जेरबंद केले.
या कारवाईत दोन देशी बनावटीचे पिस्टल, चार जिवंत काडतुसे, धारदार चाकू आणि एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.

पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या जागेच्या वादातून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी हा कट रचण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी दिली.
या प्रकरणात गणेश लोखंडे, विराज बुटाले आणि संग्राम फडतरे यांना अटक करण्यात आली आहे. तर मुख्य सूत्रधार सचिन आवळे अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली.
या घटनेमुळे सांगलीसह राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.