तटकरे vs रोहित पवार! “हॉस्पिटलमधलं सत्य बाहेर काढू” थेट इशारा

Rokhthok Maharashtra 22 0

महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये संघर्ष आता टोकाला पोहोचल्याचं चित्र आहे. सुनील तटकरे यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत गंभीर इशारा दिला आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर पक्ष ताब्यात घेण्याच्या आरोपावरून हा वाद पेटला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना तटकरे म्हणाले की, “अजितदादांचं पार्थिव हॉस्पिटलमध्ये असताना काय घडलं याची सर्व माहिती माझ्याकडे आहे… त्यामुळे आता थांबा.”
तटकरे यांनी रोहित पवार यांच्यावर “डोमकावळे” असा घणाघाती टोला लगावत, सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्या विरोधात कटकारस्थान केल्याचा आरोपही केला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, पक्षाच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी आधी स्वतःच्या पक्षात काय चाललंय ते पाहावं.
तसंच, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या निर्णयांवर टीका करणाऱ्यांनाच आता पक्षाची काळजी लागल्याचा टोला त्यांनी लगावला. 1999 पासून अजितदादांविरोधात कटकारस्थानं सुरू होती, आणि आता तीच पद्धत त्यांच्या कुटुंबीयांवर वापरली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
हा वाद केवळ शब्दांपुरता मर्यादित राहणार का, की पुढे आणखी मोठे राजकीय खुलासे होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.