तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांवर मोठा दणका; ४७ लाखांचा साठा जप्त!

Rokhthok Maharashtra 2 0

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील १७ ठिकाणी धडक कारवाई करत तब्बल ४७ लाख ३६ हजार रुपयांचा संशयित पनीर, खवा, तूप आणि चीजसदृश पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत २ हजार ८०६ किलो पनीर, १३ हजार १२७ किलो खवा, ९६० किलो तूप आणि १३८ किलो चीज जप्त करण्यात आले असून सर्व नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
याचबरोबर राज्यभरात गुटखा आणि पानमसालाविरोधात १९५ छापे टाकण्यात आले. या मोहिमेत जवळपास २ कोटी रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला असून १९२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.