पाचव्यांदा झटका! पुण्यात CNG पुन्हा महाग; दर 95.75 रुपयांवर

Rokhthok Maharashtra 18 0

पुणेकर वाहनधारकांना महागाईचा आणखी एक फटका बसला आहे. शहरात CNG च्या दरात पुन्हा 1 रुपयांची वाढ करण्यात आली असून नवे दर मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत.

या दरवाढीनंतर CNG चा भाव 94.75 रुपयांवरून 95.75 रुपये प्रति किलो झाला आहे. गेल्या दोन महिन्यांत ही पाचवी दरवाढ असून इंधनाच्या सतत वाढत्या किमतींमुळे वाहनधारक, रिक्षाचालक आणि व्यावसायिक वाहतूकदारांचे बजेट कोलमडले आहे.

एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने झालेल्या दरवाढींमध्ये आतापर्यंत एकूण सुमारे 4.50 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे पूर्वी 91.50 रुपये प्रति किलो मिळणारे CNG आता जवळपास 96 रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. वारंवार होणाऱ्या दरवाढींमुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.