पुण्यात काँग्रेस नेते अभय छाजेड यांच्या कारचा भीषण अपघात

Rokhthok Maharashtra 16 0

पुण्याजवळील पिरंगुट घाटात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे.
सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, अभय छाजेड हे पिरंगुटमधील त्यांच्या आर्किटेक्चर कॉलेजमधून पुण्याकडे इलेक्ट्रिक कारने येत होते.
यावेळी घाटात कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट टेकडीवर जाऊन आदळली.

या अपघातात अभय छाजेड आणि त्यांचे चालक दोघेही जखमी झाले आहेत.
छाजेड यांच्या चेहरा, मान आणि मणक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.

घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने मदत करत त्यांना अॅम्ब्युलन्सद्वारे पुण्यातील पुना हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून लक्ष ठेवले जात आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.