पुण्यात धक्कादायक घटना… महिलेच्या मृत्यूमागचं CCTV मधून उघड झालं सत्य………!

Rokhthok Maharashtra 20 0

पुण्यात एका महिलेचा नग्न अवस्थेत मृतदेह सापडला आणि संपूर्ण शहर हादरलं! बलात्कार करून हत्या झाल्याची चर्चा सुरू झाली, पण जेव्हा पोलिसांनी CCTV तपासले, तेव्हा समोर आलेलं सत्य त्याहूनही भयानक होतं!
चाकण परिसरात १६ मार्चच्या मध्यरात्री २ च्या सुमारास शोभा विजय वाघमारे या महिला जात असताना, ६ ते ७ भटक्या कुत्र्यांनी त्यांना घेरलं. स्वतःला वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण कुत्र्यांच्या टोळीने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला.
मृतदेहाची अवस्था पाहून सुरुवातीला बलात्कार आणि हत्येचा संशय व्यक्त झाला.

 

मात्र, तपासात समोर आलं की, कुत्र्यांनी केलेल्या १५ मिनिटांच्या हल्ल्यात महिलेचे कपडे फाटले होते आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. अतिरक्तस्रावामुळे त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेनंतर चाकण परिसरात खळबळ उडाली असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.