पुण्यात भोंदूगिरीचा धक्कादायक पर्दाफाश! 😳

Rokhthok Maharashtra 15 0

“पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे…”

खेड तालुक्यातील मंदोशी आणि राजपूर येथे दोन कथित भगतांनी भूत-करणीच्या नावाखाली एका कुटुंबाला मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे.

किसन तळपे आणि मंगेश कारोटे यांनी ‘जागरण’च्या बहाण्याने घरात भूत असल्याची भीती निर्माण केली आणि विविध विधी करण्यासाठी दबाव टाकल्याचं समोर आलं आहे.

या प्रकरणात ऑडिओ रेकॉर्डिंगसह पुरावे समोर आल्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पीडित कुटुंबाने अंधश्रद्धा विरोधी कायद्यांतर्गत कारवाईची मागणी केली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

👉 “नागरिकांनी अशा भोंदूगिरीपासून सावध राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे.”

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.