“बोगस प्रमाणपत्र… आणि नगरसेवक पद धोक्यात! मुंब्र्यातील एमआयएमच्या सहर शेख पुन्हा वादात…”

Rokhthok Maharashtra 17 0

“बोगस प्रमाणपत्र… आणि नगरसेवक पद धोक्यात!
मुंब्र्यातील एमआयएमच्या सहर शेख पुन्हा वादात…”

मुंब्रा, ठाणे महापालिका आणि सहर शेख…
ज्या विजयावर त्या राजकीय विरोधकांना डिवचत होत्या
तो विजयच आता प्रश्नचिन्हात आला आहे.
सहर शेख यांनी निवडणूक लढवताना
बोगस जात प्रमाणपत्र सादर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय.

प्राथमिक माहितीनुसार —
त्या मूळ यूपीच्या रहिवासी असूनही
महाराष्ट्राचा ओबीसी दाखला मिळवल्याचा दावा केला जातोय.
तसंच स्थलांतरितांसाठी आवश्यक असलेला नमुना 10 न वापरता
नमुना 8 वापरून प्रशासनाची दिशाभूल केल्याचंही समोर येतंय.

या प्रकरणाची चौकशी सध्या ठाणे तहसीलदार करत आहेत.
आणि कागदपत्रांमध्ये अनेक त्रुटी आढळल्याची माहिती आहे.

या सगळ्या प्रकरणामुळे राजकारण तापलंय…
भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे
तर एमआयएमचे नेते सहर शेख यांच्या बचावात उतरले आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.