मध्यरात्री बिबवेवाडीत धुडगूस, नागरिकांत भीती

Rokhthok Maharashtra 13 0

बिबवेवाडीतील अप्पर शेळके वस्ती परिसरात मध्यरात्री काही कुख्यात गुंडांनी धुडगूस घातल्याची घटना समोर आली आहे.

माहितीनुसार, गुन्ह्यातून नुकतेच सुटलेले काही आरोपी नागरिकांना अडवत होते, शिवीगाळ करत होते आणि विद्यार्थ्यांनाही धमकावत होते.

या दरम्यान दोन गटांमध्ये वाद वाढून हाणामारी झाल्याचंही सांगितलं जात आहे.

 

या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

👉 “बिबवेवाडी पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.”

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.