‘मस्त मनी’ लोन ॲपचा महाघोटाळा! २३४ कोटींची फसवणूक, मोबाईल हॅक करून ब्लॅकमेलिंग

Rokhthok Maharashtra 20 0

देशभरात ‘मस्त मनी’ लोन ॲपच्या माध्यमातून तब्बल २३४ कोटी रुपयांची सायबर फसवणूक उघडकीस आली आहे. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी मुख्य आरोपी कामिल सिद्धीकी याला अटक केली असून त्याच्या आणखी तीन साथीदारांचा शोध सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, एमसीए शिक्षण घेतलेल्या कामिल सिद्धीकीने ‘मस्त मनी’ हे लोन ॲप तयार केले. हे ॲप आतापर्यंत ५ लाख ३२ हजार जणांनी डाउनलोड केले होते.
ॲप डाउनलोड होताच मोबाईलमधील डेटा आणि फोटो गॅलरीवर सायबर गुन्हेगारांचा ताबा मिळत होता. सुरुवातीला २० ते ५० हजार रुपयांचे कर्ज देऊन नंतर अनेक पटींनी वसुली केली जात होती.
पैसे न दिल्यास फोटो मॉर्फ करून अश्लील फोटो किंवा व्हिडिओ तयार करत सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देत ब्लॅकमेल केले जात होते.
या टोळीने २ लाख ३४ हजार नागरिकांकडून तब्बल २३४ कोटी रुपये उकळल्याचा धक्कादायक खुलासा पोलिस तपासात झाला आहे.
अनोळखी लोन ॲप डाउनलोड करण्यापूर्वी काळजी घ्या आणि अशा फसवणुकीपासून सतर्क राहा

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.