“मी आधीच सांगितलं होतं…” रोहित पवारांचा खुलासा

Rokhthok Maharashtra 1 0

रोहित पवारांनी स्पष्ट केली भूमिका… बारामतीत नवा राजकीय ट्विस्ट 🚨
बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
सुनेत्रा पवार यांच्या सांगता सभेला
आमदार रोहित पवार अनुपस्थित राहिल्याने
राजकीय चर्चांना उधाण आलं होतं.
यावर आता रोहित पवार यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे.
👉 “मी आधीच सांगितलं होतं की
मी महायुतीच्या व्यासपीठावर जाणार नाही,”
असं त्यांनी स्पष्ट केलं.
ते पुढे म्हणाले—
“अजितदादांप्रती प्रेम आणि आदर म्हणून
मी तीन दिवस प्रचार केला.
पण माझी राजकीय भूमिका स्पष्ट आहे.”
रोहित पवारांनी सांगितलं की
बारामतीकर अजित पवारांच्या कामावर विश्वास ठेवून
सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार आहेत.
दरम्यान, त्यांनी भाजपवरही जोरदार टीका करत
राज्यात भोंदूगिरी वाढत असल्याचा आरोप केला.
👉 “सामान्य लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या,
शेतकऱ्यांसाठी आंदोलन करा,” असा सल्लाही त्यांनी दिला.
तसेच अजित पवारांच्या अपघात प्रकरणाच्या तपासावर
ते म्हणाले—
“१० मेपर्यंत थांबू, त्यानंतर कडक भूमिका घेऊ.”
🔥 या सर्व वक्तव्यांमुळे बारामतीच्या राजकारणात
नवा रंग चढला आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.