राज्यात IPS अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या; कृष्ण प्रकाश, तेजस्वी सातपुते यांच्यावर मोठी जबाबदारी

Rokhthok Maharashtra 1 0

राज्यातील पोलिस खात्यात मोठे फेरबदल करण्यात आले असून अनेक वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नती जाहीर करण्यात आल्या आहेत.
मनोजकुमार शर्मा हे मुंबईच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे नवे सहपोलीस आयुक्त असतील, तर अनिल कुंभारे यांच्याकडे मुंबई गुन्हे शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे. सुवेझ हक प्रशासन विभागाचे सहपोलीस आयुक्त, तर सत्यनारायण चौधरी मुंबई वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त असणार आहेत. राजेश प्रधान आर्थिक गुन्हे शाखेचे नवे सहपोलीस आयुक्त म्हणून काम पाहतील.
कृष्ण प्रकाश यांची प्रशिक्षण विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवीण पडवळ नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक असतील, तर लखमी गौतम कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून काम पाहतील. परमजित दहिया यांच्याकडे एटीएसची जबाबदारी देण्यात आली आहे.
पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांची कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. तेजस्वी सातपुते या पुणे गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस आयुक्त असतील.
तसेच संजय दराडे हे पुण्याचे नवे सहपोलीस आयुक्त असणार आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.