सिया-चेतनने आधीच गुपचूप लग्न केलं?

Rokhthok Maharashtra 2 0

पुण्यातील बहुचर्चित लोहगड हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. मुख्य संशयित सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी तब्बल चार महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न केल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.
आरोपींच्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅप चॅट आणि डिलीट केलेला डेटा रिकव्हर केल्यानंतर पोलिसांना महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. तपासानुसार, नोव्हेंबरमध्ये होणारे केतन अग्रवालसोबतचे लग्न मोडल्यास कुटुंबीय नाराज होतील, या भीतीतून केतनची हत्या करण्याचा कट रचल्याचा संशय आहे.
याहूनही धक्कादायक म्हणजे, लोहगड किल्ल्यावर घटना घडवण्यापूर्वी दोघांनी पुण्यातील लुल्लानगर परिसरातील टेकडीवर जाऊन या कृत्याचा सराव केल्याचेही तपासात समोर आले आहे.
दरम्यान, न्यायालयाने सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.